Khopoli Mangesh Kalokhe : मंगेश काळोखे प्रकरण; भरत भगतला खालापूर हद्दीतून अटक
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Khopoli Mangesh Kalokhe ) रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची निघृण हत्या करण्यात आली. खोपोली नगरपरिषदेचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे निवडून आल्या.
मंगेश काळोखे यांच्या निघृण हत्येनंतर खोपोलीमध्ये तणावाचे वातावरण असतानाच, पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसात ही हत्या करण्यात आली. या हत्येच्या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश आल्याचे पाहायला मिळत आहे.
भरत भगत यांना खालापूर तालुका हद्दीतून पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येतील 11 आरोपींना अटक करून 13 दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर इतर 3 आरोपी अद्याप पोलीस कोठडीत आहेत.
Summary
मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश
भरत भगतला खालापूर हद्दीतून अटक
हत्येच्या कटात सामील असल्याचा भरतवर आरोप
