महाराष्ट्र
माणिकपुंज धरण ‘ओव्हर फ्लो’, नांदगाव तालुक्यातील काही गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण आज ओव्हर फ्लो झाल्याने नांदगाव शहर तसेच तालुक्यातील काही गावांचा पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. नांदगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदगाव तालुक्यात पर्जन्यमान कमी असल्याने दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात.
तालुक्यातील पूर्व भागातील जळगांव बुद्रुक, न्यायडोंगरी, पिंपरखेड, मुळडोंगरी, सावरगाव, कासारी, बाणगांव, कसाबखेडा, जळगांव खुर्द, हिंगणे देहरे आदी गावांसह चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांमध्ये सिंचनासाठी उपयुक्त ठरणार आहे. मागील तीन दिवसांपासून वरुणराजा सलग बरसत असल्याने नांदगावकरांनी समाधान व्यक्त केले.