कांद्याच्या बाजारभावावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा शेतकऱ्यांनाच सुनावलं , म्हणाले...
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य केलं होते. त्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
यातच आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं आहे. कांद्याच्या बाजारभावावरून बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, "कांद्याची लागवड आणि निर्यांतबंदी हे दर वर्षाला बदलतं सूत्र आहे. एखाद्या शेतकऱ्याला 2-५ हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे गावातील सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात हा पण चुकीचा संदेश आहे."
"त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही दुप्पट का तिप्पट. तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट गेल्यावरती भाव पडणारच. त्यामुळे किती लागवड करावी आणि कशी करावी या संदर्भातलं मार्गदर्शन सरकारने करणं अपेक्षित आहे." असे माणिकराव कोकाटे म्हणाले.