Manikrao Kokate : कोकाटेंची आज 'कोरोनरी अँजिओप्लास्टी' टेस्ट होणार; उपचार करणाऱ्या 2 डॉक्टरांचा पोलिसांनी नोंदवला जबाब
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Manikrao Kokate ) सदनिका गैरव्यवहार प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय देत शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा आणि 10 हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आली आहे. माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला असून आता या खात्याचा पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणार आहे.
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारला असून राजीनाम्याचे पत्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या न्यायालयीन निर्णयामुळे कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज माणिकराव कोकाटेंची 'कोरोनरी अँजिओप्लास्टी' टेस्ट होणार असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी कोकाटेंवर उपचार करणाऱ्या 2 डॉक्टरांचा जबाब नोंदवला असून आतापर्यंत करण्यात आलेल्या उपचाराचा अहवाल घेण्यात आला आहे. पुढे काय उपचार करणं अपेक्षित आहे याबातची माहिती लेखी स्वरुपात मागितली आहे.
Summery
कोकाटेंची आज कोरोनरी एन्जिओप्लास्टी टेस्ट होणार
पोलिसांनी नोंदवला कोकाटेंवर उपचार करणाऱ्या 2 डॉक्टारांचा जबाब
आतापर्यंत करण्यात आलेल्या उपचाराचा घेतला अहवाल
