Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Manikrao Kokate) माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सदनिका गैरव्यवहार प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय देत शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा आणि 10 हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आली आहे.
माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला असून आता या खात्याचा पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर करण्यात आला आहे.
यातच माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच होणार असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत क्रीडा व अल्पसंख्याक खाते अजित पवारांकडेच राहणार आहेत.
Summery
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजूर
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मंजूर केला राजीनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिफारशीनुसार राज्यपालांची कारवाई
