महाराष्ट्र
Rohit Pawar : माणिकराव कोकाटे यांची रोहित पवारांना मानहानीची नोटीस
माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली.
(Rohit Pawar) माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर विधानसभेतील माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती.
रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. याच पार्श्वभूमीवर आता मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रमी व्हिडिओ प्रकरणावरुन आमदार रोहित पवार यांना मानहानीची नोटीस बजावली आहे.