नवाब मलिकांचा माझ्यावर चुकीचा आरोप; मनीष भानुशालीने आरोप फेटाळला

नवाब मलिकांचा माझ्यावर चुकीचा आरोप; मनीष भानुशालीने आरोप फेटाळला

Published by :
Published on

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर जोरदार राजकारण रंगू लागलंय. नबाव मलिकांनी आर्यन खान कारवाईवरून एनसीबीच्या आडूनही भाजपाला खडेबोल सुनावले होते. मनिष भानुषाली हा भाजपाचा उपाध्यक्ष आहे. एनसीबीला सांगावे लागेल की त्यांचे आणि एनसीबीचे काय संबंध आहेत?" असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. या सवालावार आता दस्तुरखुद्द मनीष भानुशालीने लोकशाही न्यूजवर त्यांच्यावर लागलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले.

एका व्हिडीओमध्ये एक अधिकारी आर्यन खानला एनसीबीच्या ऑफिसमध्ये घेऊन जात असल्याचे दिसले. पहिल्या व्हिडीओतील व्यक्तीचे नाव केपी गोसावी आहे तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव मनिष भानुषाली आहे. मनिष भानुषाली हा भाजपाचा उपाध्यक्ष आहे. मनिष भानुषालीचे फोटो पंतप्रधान मोदी आणि अमित शाह, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासोबत आहेत. एनसीबीला सांगावे लागेल की त्यांचे आणि एनसीबीचे काय संबंध आहेत?" असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

क्रुझवरील रेडच्यावेळी मी तिथे उपस्थिक होते. मीचं या संदर्भातील माहीती एनसीबीली दिली असल्याचे स्पष्टीकरण मनीष भानुशालीने दिले. तसेच मी पूराव्यासकट सांगेन, मला याबाबतची माहिती मला मिळाली होती. या रेडमध्ये के. पी. गोसावी यांचे नाव समोर येत आहे. के. पी. गोसावी हा माझ्या मित्राद्वारे आले असल्याची माहिती मनीष भानुशालीने दिली.

मी देशाचा सामान्य नागरीक आहे. म्हणून ही माहिती एनसीबीला दिली. मी भाजपाचा सामान्य कार्यकर्ता आहे. माझे कोणत्याही बड्या नेत्याशी संबंध नाही आहेत. त्यामुळे कुठलीही माहिती न घेता माझ्यावर चुकिचा आरोप करण्यात आला, त्यांच्याविरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती मनीष भानुशालीने दिली.
एनसीबीकडून ज्ञानेंदर सिंग आणि समीर वानखेडे यांनी प्रभाकर साईल, मनीष भानुशाली, आदिल उस्मानी, अर्पणा राणे, प्रकाश बहादूर हे वैयक्तिक साक्षीदार असल्याची माहिती दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com