Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं

Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. सुधारित अध्यादेश सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. 

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांची गळाभेट घेत पाठ थोपटली आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले. जरांगे पाटलांची विजयी सभा आज वाशीमध्ये पार पडणार आहे. मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांची वाशीत होणाऱ्या विजयी सभेत एक-दोन नव्हे तर तब्बल सात जेसीबीच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्यांवर फुलांची उधळण करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com