महाराष्ट्र
Maratha Reservation : अल्टीमेटमच्या तारखेवरुन जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद? नेमकी तारीख कोणती
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केले होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केले होते. राज्यभरात अनेक आंदोलनं सुरु होती. काल सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे.
मात्र आता एक वेगळीच चर्चा आहे ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेल्या तारखेवरून मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद झालेला पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरची मुदत दिली आहे तर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत 2 जानेवारीची तारीख सांगितली. यावरुन आता तारीख नेमकी कोणती अशी चर्चा रंगली आहे.