...तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; मनोज जरांगेंची घोषणा

...तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; मनोज जरांगेंची घोषणा

अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्वाची बैठक पार पडली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
Published on

जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्वाची बैठक पार पडली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. कायद्याच्या आधारे प्रमाणपत्र मिळेल तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू ठेवणार, अशी घोषणा जरांगेंनी केली आहे.

...तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; मनोज जरांगेंची घोषणा
Raj Thackeray: मोदींना स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम आहे; मग आपल्याला का नाही?

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमच्यासाठी हा कायदा पाहिजे म्हणून त्याबाबत कायदा पाहिजे असलेल्यांनी आपले मत मांडा. आपल्याला सतत सावध राहावे लागणार आहे. आतापर्यंत 54 लाख नोंदी मिळाल्या आहेत. ज्याची नोंद मिळाली त्याने शपथ पत्र करून द्यायची, त्याची गृह चौकशी करायची, मग तो खोटा असला तर प्रमाणपत्र नाही दिलं तरी चालेल.

काल अध्यादेश निघाला, आता राजपत्रित आदेशही निघाला आहे. हे आंदोलन आपण सुरूच ठेवायचं. कायदा पारित केला, त्यापासून मिळाले काय, नुसता तो कागद राहू नये. सग्या सोयऱ्यांचा कायदा पारित झालेला आहे, पण तो कायदा कागदावर राहिला नाही पाहिजे. त्याची अंमलबजावणी करायची आहे. ज्याची नोंद मिळाली नाही, त्यासाठी हा कायदा आहे. ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला याचा फायदा झाला का, 1 तरी सोयऱ्याला त्या कायद्याच्या आधारे प्रमाणपत्र मिळेल तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू ठेवणार, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

दरम्यान, मी उद्या रायगडला दर्शनाला जाणार आहे. 29 जानेवारी रोजी रायगडकडे निघणार आणि 30 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेणार आहे. मग मी घरी जाणार, असेही जरांगेंनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com