Manoj Jarange Patil : 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा

Manoj Jarange Patil : 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा

छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात मनोज जरांगे पाटील उपचार घेत आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात मनोज जरांगे पाटील उपचार घेत आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार आहे. सरसकट आरक्षणाच्या मुद्द्यावर 24 डिसेंबरला सविस्तर बोलणार.

दौऱ्यासाठी आम्हाला कुणी पैसे देऊ नका आम्ही पैसे घेत नाही. 15 ते 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौरा करणार. आमचा लढा सामान्य मराठ्यांसाठी आहे. या दौऱ्यात ते सभा घेणार आहेत. आंदोलनाला डाग लावू नका. पैसै कमवण्यासाठी आमचं आंदोलन नाही. एकजूट राहा, मतभेद होऊ देऊ नका. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com