Manoj Jarange Patil : 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार

Manoj Jarange Patil : 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार

मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. मुंबईतील ट्रॅप मला आधी समजत होता. मुंबई आंदोलनाचा आधीही ट्रॅप रचला होता. काहीजण सुपारी घेऊन बोलतात. कधीच काही खोटं केलं नाही, करणार नाही. 39 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र मिळालं. 70 - 75 वर्षात मिळालं नाही ते आता मिळालं.

राज्यात 10 - 20 जण सुपारी घेऊन बोलतात. 54 लाख नोंदी सापडल्यात. मराठे शांततेत गेले, शांततेत आरक्षण घेऊन आले. नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात. नवीन काही असेल तर शासन निर्णय घ्यावा लागतो. सत्तेतील काही लोक सोशल मीडियावर टीका करतात. गप्प बसले नाही तर त्यांच्या पक्षाचं आणि नेत्यांचे नाव जाहीर करणार. 10 फेब्रुवारीपासून मी आमरण उपोषणाला बसणार असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

खोटं बोलून मराठ्यांचं वाटोळं करु नका. 5 महिने झाले मी या जागेवर बसलो आहे. शेवटपर्यंत मराठा समाजासाठी लढणार. अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर व्हावे म्हणून आंदोलन. नोंदी सापडलेल्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करा. मराठा समाजात फूट पाडू नका. कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com