Manoj Jarange Patil : घराबाहेर पडा, मुंबईकडे चला

Manoj Jarange Patil : घराबाहेर पडा, मुंबईकडे चला

आंदोलनाबाबत सर्व माहिती उद्या देणार
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुंबईतील आंदोलनाचा मार्ग उद्या देणार आहे. आंदोलनाबाबत सर्व माहिती उद्या देणार. सरकार आरक्षणावर त्यांचे काम करतंय. आम्ही आमचं काम करतोय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आमचा लढा. मराठा आणि कुणबी एकच. आमचं आरक्षण ओबीसीतून, पुरावेही सापडले.

50 टक्क्यांच्या वर आरक्षण गेलं तर ते टिकणारं असेल का? सरकार आरक्षण देणार नाही, आम्हाला माहिती आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या. सरकारने गोळ्या घातल्या तरी माघार नाही. आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी. घराबाहेर पडा, मुंबईकडे चला. आमचा नाईलाज, मुंबईला यावंच लागेल. सर्व मराठ्यांनी मुंबईला जायचं आहे. आमची लढाई सरसकट आरक्षणासाठी सुरु आहे. आम्हाला आगीतून फुफाट्यात कशाला ढकलत आहे.

मराठ्यांशिवाय सरकारला पर्याय नाही. मुंबईत गेल्यानंतर पुन्हा माघार नाही. आरक्षण दिलं तर मुंबईला जायची हौस नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नका. मराठा समाजाची नाराजी अंगावर ओढून घेऊ नका. फडणवीस यांना मी सांगितलं आहे. तुम्ही आमचे ट्रॅक्टर अडवू नका. अडवले तरीही आम्ही मुंबईत येणार. अंतरवाली सारखे प्रयोग आता करू नका. आता कोट्यवधी मराठे एकत्र आहे. आता वाटेला जाल तरी जड जाईल. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com