Manoj Jarange Patil : गाड्या, ट्रॅक्टर अडवलं तर फडणवीस साहेबांच्या दारात जाऊन बसू

Manoj Jarange Patil : गाड्या, ट्रॅक्टर अडवलं तर फडणवीस साहेबांच्या दारात जाऊन बसू

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाचा मार्ग जाहीर केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाचा मार्ग जाहीर केला आहे. 20 जानेवारीला अंतरवालीतून सगळे मराठे बांधव निघतील. अंतरवाली सराटीतून मोर्चाला सुरुवात होईल. अंतरवाली ते मुंबई पायी प्रवास करणार. सकाळी 9 वाजता अंतरवालीतून निघणार.

याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले आहे. हे शिष्टमंडळ आंदोलनासाठी मुंबईतील मैदानाची पाहणी करणार आहेत. शिवाजी पार्क, बीकेसी, आझाद मैदानाची पाहणी करणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, दिशा मुंबईची, ध्येय आरक्षणाचे. 20 जानेवारीला गाव सोडणार, पायी मुंबईला जाणार. मुंबईतील सर्वच मैदानं आम्हाला लागतील. सर्व मराठा आंदोलकांनी एकत्र यावं. आरक्षण घेऊनच परतणार. गाड्या, ट्रॅक्टर कोण जप्त करतो तेच बघतो.

मतभेद सोडून सर्व मराठांनी एकत्र यावं. गाड्या, ट्रॅक्टर अडवलं तर फडणवीस साहेबांच्या दारात जाऊन बसू. गुन्हे दाखल कसे करतात ते बघू. तुम्ही आरक्षण द्या, आम्हाला मुंबईला जायची हौस नाही. आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार. येताना आरक्षण घेऊनच येणार. आरक्षणाचा हेतू ठेऊनच मुंबईला जाणार. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com