महाराष्ट्र
Video : मनोज जरांगे पाटलांना पाहून आई झाली भावूक, म्हणाल्या...
सरकारच्या जीआरनंतरही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. जीआरमध्ये सुधारणा करुन सरसकट आक्षणाची मागणी त्यांनी केली आहे.
जालना : सरकारच्या जीआरनंतरही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. जीआरमध्ये सुधारणा करुन सरसकट आक्षणाची मागणी त्यांनी केली आहे. तर, सरकारचे चर्चेचे आमंत्रण मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारले आहे. यानुसार जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी मुंबई पोहोचले आहे. तसेच, सरसकट आरक्षण दिले नाहीतर उद्यापासून सलाईनही बंद करण्याचा अल्टीमेटम जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. अशातच, मनोज जरांगे पाटील यांच्या आईने उपोषणस्थळी त्यांची भेट घेतली. यावेळी दोघेही भावनिक झाल्याचे दिसले.
दरम्यान, आज रात्री 10 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीतून काय तोडगा निघतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.