मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला यश; जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया म्हणाले...

मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला यश; जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया म्हणाले...

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. सुधारित अध्यादेश सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. 

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हा विजय संपूर्ण मराठा समाजाचा आहे. सरकारने सगेसोयऱ्यांबाबत जीआर दिला. आमच्या विजयाचं श्रेय सर्व मराठा समाजाला. केसेस मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. मुंबईकडे आलो नसतो तर आरक्षण मिळालं नसते. मराठा समाजासाठी भविष्यातही लढा देत राहणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अध्यादेश घेणार. अंतरवालीत बैठक घेऊन विजयी सभेची तारीख सांगणार. विजयी सभा लवकरच घेणार. मराठा समाजाचा हा ऐतिहासिक विजय आहे. असे जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगेंना सुधारित अध्यादेश सुपूर्द करण्यात आला असून त्या अध्यादेशामध्ये सगेसोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे. यासोबत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, सरकारने सगेसोयरेबाबतचा जीआर दिला आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याबाबत आदेश दिले आहेत. तसेच वंशावळीसाठी तालुका स्तरावर समिती नेमली. आरक्षणावर अधिवेशनात कायदा येणार. आता मुंबईला जाणार नाही. वाशीत विजयी सभा असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com