Manoj Jarange Patil : बजेटमध्ये मराठा आरक्षण देता आले तर पटकन द्या

Manoj Jarange Patil : बजेटमध्ये मराठा आरक्षण देता आले तर पटकन द्या

मनोज जरांगे पाटील माध्यमाशी बोलत होते.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील माध्यमाशी बोलत होते. त्यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, संभ्रम आणि विसंगत वक्तव्य करू नये. 15 तारखेला अधिवेशन आहे. विश्वास आहे म्हणून वेळ दिला. काहीजण म्हणत आहेत मुंबई गेल्यामुळे काय मिळाले, ज्यांना वाटते त्यांनी अंतरवालीत यावे. तुमचे म्हणणे मांडावे. काय मिळवायला पाहिजे होते असे ज्यांना वाटते त्यांनी यावे. तुमचे शब्द आम्ही त्या मध्ये टाकू. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे म्हणून 10 तारखेला आमरण उपोषण. सगे सोयरे हा साडेतीन महिने झाले शब्द आहे. अध्यादेश घेऊन आलोत.

27 टक्के आरक्षणाला आम्ही चॅलेंज करणार म्हणजे करणार. मराठे मुंबई शांततेत गेले आणि आले. दुसरा समाज असता तर मुंबईत धिंगाणा झाला असता. ते पाच पन्नास आहेत त्यांना विरोधात बोलायची सवय आहे. सग्यासोयरे पत्र मिळाले तर बघा महादिवाळी आहे. आम्ही शांततेत गेलो शांततेत आलो पण काही जणांना वाटत होते त्या त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही.

मराठ्यांच्या सर्व अभ्यासकाला लहान भाऊ विनंती करतो त्यांनी अंतरवाली येथे यावे आणि कायद्यात काय व्हायला पाहिजे होते ते सांगावे आणि ते मी सरकारला सांगतो आणि कायद्यात बदल करायला सांगतो. बजेटमध्ये मराठा आरक्षण देता आले तर पटकन द्या. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com