Manoj Jarange Patil : 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नाव जाहीर करणार

Manoj Jarange Patil : 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नाव जाहीर करणार

मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारकडून जोरात काम सुरु आहे. माझी तब्येत ठणठणीत आता पुन्हा जोमाने कामाला लागणार. आरक्षणाचे काम थांबणार नाही. जे आमचंच आहे ते सरकार देतंय. सरकारने ठिकठिकाणी कक्ष स्थापन केलं आहेत. आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून आम्हाला कुणबी दाखले मिळत आहेत. ओबीसी नेतेचं विरोध करतात. हक्काचं आरक्षण मिळायलाच हवं. पुरावे असून 40 वर्ष मराठ्यांचे वाटोळं झालं. दोन - तीन दिवसांत पुन्हा मैदानात उतरणार.

आमचंच आरक्षण आम्हाला मिळतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही. ज्यांनी आमच्या नोकऱ्या हडपल्या त्यांना काढून टाकायला हवं. सामान्य मराठ्यांचे वाटोळं करुन मराठा नेते मंत्री झाले. आमच्या नोकऱ्या आम्हाला मिळाव्यात. कुणी ओबीसी आरक्षण रोखलं त्याची यादीही समोर आणणार. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नाव जाहीर करणार. पुरावे सापडल्याने आमचे आरक्षम सिद्ध होते.

जे ओबीसींना मिळतं त्या सुविधा हव्यात. 40 वर्षानंतर आरक्षण मिळू लागलंय आम्ही खूश आहोत. आम्हाला आमच्या हक्कांचे राजकीय आरक्षण हवं. आमच्याकडे नोंदी आहेत. मराठा आरक्षण मिळू नये हे नेत्यांना वाटतं. मराठा ओबीसी होता त्याचे पुरावे लपवून ठेवलं. आधी आम्हाला आरक्षण द्या मग काय वाढवायचे आहे ते वाढवा. ओबीसी आरक्षण हा मराठ्यांचा हक्क आहे. मराठा नेत्यांचा नेमका विरोध कशाला? आमचं वाटोळे आमच्याच नेत्यांनी केलं. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com