Manoj Jarange patil : मराठा समाजाने नेत्यांना मोठं केलं, आज तेच नेते मराठा समाजाकडे दुर्लक्ष करतात
पुण्यातील खराडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सभा होती. या सभेतून मनोज जरांगे पाटील बोलत होते. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षणाची लढाई अनेक पिढ्यांपासून सुरु आहे. मराठा समाज सर्वांच्या कल्याणासाठी लढत राहिलाय. मराठा समाजाने कधी जातीवाद केला नाही. मराठ्यांनी कधीच कोणाची जात शोधली नाही. मराठा समाजाने प्रत्येकाला आधार दिला. स्वत:च्या लेकराला काही न देता दुसऱ्याला कमी पडायला दिलं नाही. मराठा समाजाने कधी कुणाचा द्वेष केला नाही. मराठा समाजाने स्वत:चे आरक्षण दुसऱ्याला दिलं.
मराठा समाजाने नेत्यांना मोठं केलं. सर्व पक्षाच्या नेत्यांना मोठं करण्याचे काम मराठा समाजाने केलं. आमची लेकरं नोकरी, शिक्षणासाठी फिरत आहेत. नेते आमच्या लेकरांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच आपला घात केला. मराठा नेते समाजाच्या पाठिशी उभे राहायला तयार नाहीत. लेकरांना न्याय मिळावा यासाठी संघर्षाची तयारी ठेवा. मराठ्यांनो आता सानध व्हा. मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र रचलं. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.