महाराष्ट्र
Manoj Jarange Patil : 20 जानेवारीपर्यंत मार्ग निघणार असेल तर चर्चेला तयार
मनोज जरांगे पाटलांनी बीडच्या सभेत मोठी घोषणा केली आहे.
मनोज जरांगे पाटलांनी बीडच्या सभेत मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे आमरण उपोषण करणार असून आता मोर्चा थेट मुंबईकडे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये 26जानेवारीला आझाद मुंबईवर उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेत म्हटले होते की, अंतरवाली हून मराठ्यांचा जनसागर मुबंईला जायचं आहे. कुणी गाडी पेटवली तर त्याला आपणच पकडून द्यायचं. कुणाला जाळपोळ करु द्यायची नाही. आम्हाला मुंबईला यायची हौस नाही पण आता आमच्या लेकरांना न्याय हवा आहे. २० तारखेच्या आत आरक्षण देता आलं तर बघा.
याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 20 जानेवारीपर्यंत मार्ग निघणार असेल तर चर्चेला तयार आहे. 26 जानेवारीपासून जरांगेंचं मुंबईत उपोषण करणार असून 20 तारखेला अंतरवाली सराटीतून मुंबईसाठी निघणार असल्याची माहिती मिळत आहे.