तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही; भुजबळांच्या टीकेला जरांगेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...

तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही; भुजबळांच्या टीकेला जरांगेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...

जालन्यात आज ओबीसी समाजाची जाहीर एल्गार महासभा झाली. या सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या टीकेला आता मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

सांगली : जालन्यात आज ओबीसी समाजाची जाहीर एल्गार महासभा झाली. या सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी बेसन भाकर ठेचा कांदा खाल्ला पण तुमच्या सारखा सासऱ्याच्या घरी भाकरीचे तुकडे मोडत नाही, अशी जहरी टीका भुजबळांनी केली. या टीकेला आता मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही; भुजबळांच्या टीकेला जरांगेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...
मराठा तरुणांनी शेंदूर लावलेल्या दगडाच्या मागे फिरू नये; भुजबळांचा हल्लाबोल

सासरा जावयाचा विषय नाही. वयाने तुम्ही मोठे आहोत, आम्हाला काढायला लावू नका, तुमचा बायोडेटा गोळा केलेला आहे, असा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. कोणी तर एका माकडाने स्वतःच्या स्वार्थीसाठी सांगितले असेल. मराठयांच्या जीवावर मोठे झालेले आहात.

आमच्या पायावर पाय देऊ नका, नाही तर तुमची सुद्धा खैर करणार नाही. वयाने तुम्ही मोठे आहेत भान ठेवून बोला. मराठयांच्या शेपटयावर पाय दिल्यावर काय होते? हे तुम्हाला पुढच्या काळात कळेल. धमक्या देऊन राज्यात शांतत बिघडवू नका, सरकारला पण सांगतो यांच्यावर लक्ष ठेवा, असेही त्यांनी म्हंटले आहे.

त्यांचे आता वय झाले आहे, त्यामुळे ते काहीही बोलत आहेत, त्यामुळे उद्यापासून त्यांना आम्ही महत्त्व देणार नाही. भुजबळ आगोदर मुरब्बी राजकारणी होते मात्र आता राहिले नाहीत. हे सर्व जनतेच्या नजरेतून उतरलेले आहेत त्यामुळे आता यांना महत्त्व देणार नाही. तुम्ही लोकांचे रक्त पिता पैसे खाता आता तुम्हाला कोण देव म्हणणार नाही, असा पलटवारही त्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com