मनोज जरांगे पाटील यांच्या सांगलीतील सभेची तयारी पूर्ण; ७० हजारांहून अधिक लोकांची बैठक व्यवस्था

मनोज जरांगे पाटील यांच्या सांगलीतील सभेची तयारी पूर्ण; ७० हजारांहून अधिक लोकांची बैठक व्यवस्था

मनोज जरांगे यांच्या सांगलीतील सभेची तयारी पूर्ण
Published by  :
Siddhi Naringrekar

संजय देसाई, सांगली

मनोज जरांगे यांच्या सांगलीतील सभेची तयारी पूर्ण झाली आहे. ५ फूट उंच व्यासपीठ, ५ एलईडी स्क्रीन, ७० हजारांहून अधिक लोकांची बैठक व्यवस्था, गाड्या पार्किंगसाठी वेगवेगळी ठिकाणं आणि मोठे ड्रोन अशी मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे यांच्या विट्यातील सभेची जंगी तयारी पूर्ण झाली आहे. अशी माहिती सकल मराठा समाजाचे नेते शंकर मोहिते यांनी दिली आहे. मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे-पाटील हे आपल्या तिसऱ्या टप्प्यात पुन्हा महाराष्ट्राचा दौरा सुरू करत आहेत.

या दौ-याला १५ नोव्हें बरपासून सुरुवात होत आहे. येत्या शुक्रवार १७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजता विट्यातील श्री चौंडेश्वरी मंदिर चौकात सांगली जिल्ह्यातील पहिली सभा होत आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी सकल मराठा समाजाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत माहिती देताना शंकर मोहिते म्हणाले. खानापूर तालुक्यातील सर्व गावात आणि वाड्यावस्त्यांवर पत्रके वाटली गेली आहेत. शिवाय पोष्टर्स लावलेल्या रिक्षा आणि डीजे लावलेली वाहने शिवाय व्हाट्स अप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात या सभेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.

शेजारच्या कडेगाव आणि आटपाडी तालुक्या तील मराठा समाजाच्या नेते आणि कार्यकर्त्यां कडूनही विट्यातील सभा उच्चांकी पार पाडण्या साठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच विटा शहरा मध्ये ज्या दिवशी सभा आहे, त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण व्यापार पेठ बंद ठेवण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांची ही जिल्ह्यातील पहिलीच सभा असल्याने ती विक्रमी सभा होईल, असा संयोजकांचा विश्वास आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com