सांगलीत धडाडणार मनोज जरांगे पाटलांची तोफ; तीन ठिकाणी होणार सभा

सांगलीत धडाडणार मनोज जरांगे पाटलांची तोफ; तीन ठिकाणी होणार सभा

मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे-पाटील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

संजय देसाई, सांगली

मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे-पाटील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज सांगली जिल्ह्यात मनोज जरांगे- पाटलांचे जंगी स्वागत आणि सभा पार पडणार आहे. विटा या ठिकाणी पहिल्यांदा जरांगे-पाटलांचे स्वागत होणार आहे,याच ठिकाणी त्यांची पहिली सभा होणार असून त्यानंतर ठिकठिकाणी मराठा समाजाच्यावतीने त्यांचा स्वागत होऊन सांगली शहरामध्ये आगमन होणार आहे.

तरुण भारत स्टेडियम मध्ये त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळी इस्लामपूर येथील राजरामबापू खुले नाट्यगृह येथे जाहीर सभा पार पडणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर या सभांच्या ठिकाणी मराठा समाजाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

५ फूट उंच व्यासपीठ, ५ एलईडी स्क्रीन, ७० हजारांहून अधिक लोकांची बैठक व्यवस्था, गाड्या पार्किंगसाठी वेगवेगळी ठिकाणं आणि मोठे ड्रोन अशी मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे यांच्या विट्यातील सभेची जंगी तयारी पूर्ण झाली आहे. अशी माहिती सकल मराठा समाजाचे नेते शंकर मोहिते यांनी दिली आहे. विटा शहरा मध्ये ज्या दिवशी सभा आहे, त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण व्यापार पेठ बंद ठेवण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांची ही जिल्ह्यातील पहिलीच सभा असल्याने ती विक्रमी सभा होईल, असा संयोजकांचा विश्वास आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com