Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा
थोडक्यात
मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून चलो दिल्लीचा नारा देण्यात आला
दिल्लीत देशभरातील मराठा समाजाचे अधिवेशन होणार
( Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून चलो दिल्लीचा नारा देण्यात आला आहे.
ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मुंबईत धडक दिल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिली आहे.
ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर पाच दिवस आमरण उपोषण केलं होतं. कार्यकर्त्यांच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी ही पुढची दिशा ठरवली असून दिल्लीत देशभरातील मराठा समाजाचे अधिवेशन होणार असून त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट अंमलबजावणीनंतर हे अधिवेशन होणार असल्याचे जरांगे म्हणाले धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेट संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.