महाराष्ट्र
मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात 'या' दिवशी होणार सभा
मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील राज्याचा दौरा करणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करत मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे.
या महाराष्ट्र दौऱ्यात 1575 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. महाराष्ट्र दौऱ्यात 9 जिल्ह्यांमध्ये होणार 24 सभा पार पडणार आहेत. 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्याची सांगता होणार असून सरकारला 24 नोव्हेंबरची शेवटची तारीख देण्यात आली आहे.
यावेळी 19 नोव्हेंबरला पुण्याच्या भोर तालुक्यातील मराठा समाजाची भेट घेणार आहेत. भोरमध्ये संध्याकाळी 4 वाजता मनोज जरांगे पाटील यांची पुण्यामध्ये सभा होणार आहे.