Gangadhar Kalkute : जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुट्टे यांना जीवे मारण्याची धमकी
थोडक्यात
जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुट्टे यांना जीवे मारण्याची धमकी
संतोष देशमुखानंतर तुझा नंबर होता अशी अज्ञाताकडून धमकी
सतीश नावाच्या व्यक्तीकडून गंगाधर काळकुंटेंना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी
(Gangadhar Kalkute ) मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी दोघांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातच आता मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुट्टे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
धनंजय मुंडे यांच्या समर्थकाने धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून सतीश नावाच्या व्यक्तीकडून गंगाधर काळकुंटेंना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संतोष भैय्या नंतर दुसरा नंबर तुझाच होता.
तुझ्यात दम असेल तर परळीतील जगमित्र कार्यालयात ये. असे या ऑडिओ क्लीपमध्ये ऐकायला मिळत आहे. गंगाधर काळकुटे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
