Ajit Pawar : नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठा धक्का; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar ) आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. नेरुळ येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून नेरुळ येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
Summary
नवी मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग
नवी मुंबईत राष्ट्रवादीला शिवसेनेचा मोठा धक्का
अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
