मराठा समाज आज अजित पवार यांच्या घराबाहेर करणार आंदोलन

मराठा समाज आज अजित पवार यांच्या घराबाहेर करणार आंदोलन

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर काल आंदोलन केलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर काल आंदोलन केलं. ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यावर भूमिका जाहीर करावी अशी मराठा कार्यकर्त्यांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांच्या घराबाहेर मराठा समाज आंदोलन करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मातोश्रीनंतर आता मराठा समाज देवगिरीवर आंदोलन करणार आहेत. सकाळी 11.30 वाजता मराठा समाजाचे जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणावर समाज बांधवांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत.

त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करुन ती जाहीर करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com