Marathi School : मराठी अभ्यास केंद्राचं आज आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आंदोलनावर ठाम
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Marathi School) मराठी अभ्यास केंद्राचं आज आंदोलन असणार आहे. मराठी शाळा जाणून बुजून बंद करण्याचे आणि त्यांचे पाडकाम करण्याचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप करत मराठी अभ्यास केंद्राकडून आज आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून पोलिसांनी परवानगी नाकारून देखील मराठी अभ्यास केंद्र आज आंदोलनावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.
हुतात्मा चौक येथे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेऊन शाळांचे पाडकाम थांबवण्याची मागणी करण्यात येणार आहे.
जर मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भेट नाही दिली तर पालिका मुख्यालयासमोरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून आज दुपारी साडेबारा वाजता हुतात्मा चौक येथून होणार आंदोलनाला सुरुवात आहे.
Summery
मराठी अभ्यास केंद्राचं आज आंदोलन
पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आंदोलनावर ठाम
मराठी शाळा जाणून बुजून बंद केल्याचा आरोप
