Gopal Shetty
Gopal ShettyTeam Lokshahi

मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाची खासदार शेट्टींना ग्वाही

खासदार गोपाळ शेट्टींच्या यांच्या मागणी पत्राला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून उत्तर आले आहे. त्यामध्ये मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
Published by :
Sagar Pradhan

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी उत्तर मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी काही महिन्यांपूर्वी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना पत्र लिहिलं होते. या पत्रात गोपाळ शेट्टी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा त्वरित निर्णय घ्यावा, अशी विनंती केली होते. त्यानंतर शेट्टी यांनी पुन्हा एकदा २८ एप्रिल रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांना स्मरण पत्र लिहले होते. गोपाळ शेट्टींच्या याच पत्राला आता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून उत्तर आले आहे. या पत्रामध्ये सांस्कृतिक विभागाने मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात दर्जा देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Gopal Shetty
Chandrashekar Bawankule On Sambhaji Bhide : भिडेंचा भाजपशी संबंध? काय म्हणाले बाबनकुळे?

नेमकं काय 'त्या' पत्रात?

आपण दिनांक 28.04.2023 रोजी पाठविलेल्या पत्राचा संदर्भ घेत आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत मंत्रालय विचाराधीन आहे आणि त्यावर अंतिम निर्णय घेतल्यानंतर ते सार्वजनिक केला जाईल. अशी ग्वाही त्यामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाकडून गोपाळ शेट्टी यांना देण्यात आली आहे.

पत्रात गोपाळ शेट्टी यांनी काय केली मागणी?

मुंबई मराठी ही एक हजार वर्षे जुनी भाषा असून 2011 च्या जनगणनेनुसार भारतात 9 कोटी लोक संख्या आहे. मराठी ते भाषिक आहेत. मातृभाषा म्हणून मराठीचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या संख्येच्या बाबतीत मराठी ही जगातील दहावी भाषा असून भारतात मराठी भाषा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या भाषेतील अनेक साहित्यकृती अत्यंत महत्त्वाच्या आणि लोकप्रिय झाल्या आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा, अशी मागणी गोपाळ शेट्टी यांनी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com