Marathi Sahitya Sammelan : आजपासून 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Marathi Sahitya Sammelan : आजपासून 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

आजपासून 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आजपासून 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आज सकाळी अमळनेरमध्ये ग्रंथ दिंडी काढण्यात आली. हे साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील सानेगुरुजी नगरी येथे होत आहे.

या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 1952 मध्ये अमळनेरमध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले होते. त्यानंतर आता अमळनेरमध्ये हे संमेलन होत आहे.

या साहित्य संमेलनाचा शुभारंभ सकाळी साडेदहा वाजता उद्घाटक सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे तर संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रवींद्र शोभणे आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com