Marathwada Water Shortage
महाराष्ट्र
Marathwada Water Shortage : मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; पावसाच्या हजेरीनंतरही गावांना दिलासा नाहीच
राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे.
(Marathwada Water Shortage ) राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र या पावसाने मराठवाड्यातील गावांना दिलासा मिळाला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीला 349 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता, 23 मेपर्यंत टँकरची संख्या वाढून 573 वर गेली आहे. 23 मेअखेरपर्यंत मराठवाड्यात 370 गावे आणि 149 वाड्यांसाठी 573 टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती मिळत आहे.
पावसामुळे टँकरग्रस्त गावांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती 'जैसे थे' पाहायला मिळत असून पावसाच्या हजेरीनंतरही टँकरग्रस्त गावांना दिलासा मिळाला नाही आहे.