Marathwada Weather Update
महाराष्ट्र
Marathwada Weather Update : मराठवाड्यात 'या' तारखेदरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
(Marathwada Weather Update ) राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. आता राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठवाड्यात 1 ते 5 जुलैदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग ताशी 30 किमी राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. 4 ते 10 जुलैदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी यंदा मे महिन्यात मोठ्याप्रमाणात अवकाळी पाऊस झाला.