Kolhapur Crime : निवडणुकीसाठी 10 लाख मागितल्याने विवाहितेनं जीवन संपवलं
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kolhapur Crime ) निवडणुकीसाठी 10 लाख मागितल्याने विवाहितेने जीवन संपवलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरातील कुरुंदवाडमध्ये ही घटना घडली.
सासऱ्याच्या निवडणूक खर्चासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावेत या मागणीच्या तगाद्यामुळेच विवाहितेने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. कौसर गरगरे असे मृत विवाहितेचं नाव असून या प्रकरणी सासरा, सासू, पती आणि जाऊ विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पती इंजमाम राजमहंमद गरगरे व जाऊ समीना डलहान गरगरे या दोघा आरोपींना न्यायालयान तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.
Summery
कोल्हापुरात हुंडाबळीसारखी घटना
निवडणुकीसाठी 10 लाख मागितल्याने विवाहितेची आत्महत्या
'निवडणूक खर्चासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणावे'
