शहीद छात्र सुभेदार अजय ढगळे यांच्यावर  लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद छात्र सुभेदार अजय ढगळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

चिपळूण बहादुर शेख येथून भारत मातेच्या जय घोषात अजय ढगळे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली
Published on

निसार शेख | चिपळूण : भारत-चीन सीमेवर शहीद झालेले छात्र सुभेदार अजय ढगळे यांच्यावर आज त्यांच्या मुळगावी मोरवणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्करी इतमामात अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिपळूण बहादुर शेख येथून भारत मातेच्या जय घोषात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. जब तक सूरज चांद रहेगा अजय साहब का नाम रहेंगा, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर त्यांचे पार्थिव निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या आई, पत्नी, मुली आणि कुटूंब यांना शोक अनावर झाला. शहीद छात्र सुभेदार अजय ढगळे यांची ज्येष्ठ कन्या रिया ढगळे हिने आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी देत अंत्यसंस्काराचा विधी पार पडला.

भारतीय लष्कराचे जवान व रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस जवानांनी शहीद छात्र अजय ढगळे यांना मान वंदना देताना हवेत बंदूकीच्या फेऱ्या झाडून अखेरचा निरोप देण्यात आला. शहीद अजय ढगळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूणचे आमदार शेखर निकम, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह जिल्हाभरातून देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com