Badlapur Fire
महाराष्ट्र
Badlapur Fire : बदलापूर MIDC मध्ये भीषण स्फोट; आगीमुळे कंपनीत बॉयलरचे 12 ते 15 पेक्षा जास्त स्फोट
बदलापुर एमआयडीसी परिसरात पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीला भीषण आग लागली.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Badlapur Fire ) बदलापुर एमआयडीसी परिसरात पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीला भीषण आग लागली. या आगीमुळे कंपनीत असलेले केमिकलचे ड्रम आणि बॉयलरचे जवळजवळ बारा ते पंधरा पेक्षा जास्त स्फोट झाले.
आगीमुळे शेजारच्या दोन कंपन्या देखील भक्षस्थानी पडल्याची माहिती मिळत आहे. बॉयलर चे स्फोट होत असल्याने अग्निशमन दलाला कंपनी परिसरातून पाण्याचा मारा करण्यात येत नव्हता. मात्र अखेर चार तासानंतर आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवलं.
कंपनीत कोणताही कामगार नसल्याने जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
Summary
बदलापूर MIDC मध्ये भीषण स्फोट
पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीला भीषण आग
आगीमुळे कंपनीत बॉयलरचे बारा ते पंधरा पेक्षा जास्त स्फोट
