Bhandara
महाराष्ट्र
Bhandara : भंडाऱ्यात BSNL कर्मचाऱ्यांच्या घरांना भीषण आग; कोट्यवधींच्या सरकारी मालमत्तेचं नुकसान
भंडाऱ्यात BSNL कर्मचाऱ्यांच्या घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Bhandara) भंडाऱ्यात BSNL कर्मचाऱ्यांच्या घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली. ओसाड पडलेल्या बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या सदनिकांना रात्री भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधींच्या सरकारी मालमत्तेचं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या इमारतींच्या परिसरात कचऱ्याचे ढीग आणि मोठी झुडुपे वाढली होती. यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले.
Summary
भंडाऱ्यात BSNL कर्मचाऱ्यांच्या घरांना रात्री भीषण आग
तुमसर शहरातील शिवाजीनगर परिसरातील घटना
कोट्यवधींच्या सरकारी मालमत्तेचं नुकसान
