थोडक्यात
सांगलीच्या विटा येथे भीषण आग
भीषण आगीत चौघांचा होरपळून मृत्यू
तीन मजली इमारतीला लागली आग
(Sangli) सांगलीच्या विटा येथे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आगीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तीन मजली इमारतीला ही लागली असून आई-वडील, मुलगी आणि नात अशा चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीचा देखील समावेश आहे. विस्टील फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत इमारत पूर्ण जळून खाक झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.
