प्रियंका गांधींसोबत दिल्लीत तासभर खलबतं; भेटीनंतर संजय राऊतांचं मोठं विधान
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज काँग्रेसच्या सरचटिणीस प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रया देताना मोठं विधान केलं आहे.आम्ही उत्तर प्रदेश आणि गोव्यात एकत्र काम करण्याचा विचार करत आहोत" अशी माध्यमांना त्यांनी माहिती दिली.
प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेली जी चर्चा झाली त्याबाबत त्या राहुल गांधी यांना माहिती देतील. तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेल. काही मुद्द्यांवर सहमती झाली आहे. जिथे निवडणुका आहेत तिथे काय परिस्थिती आहे. त्या दहशतीला कशाप्रकारे सामोरं जात आहेत, याची माहिती त्यांनी दिली, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तर बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे. ते लढवय्ये नेते होते, त्यांच्याकडे विनम्रता होती. ते हेलिकॉप्टर अत्यंत सुरक्षित होते. त्याचा असा अपघात होणे हे देशाच्या सुरक्षेला आव्हान असल्याचंही राऊत म्हणाले.