Mumbai : मुंबई मनपा निवडणूकीत महायुती अॅक्शन मोडमध्ये; उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षावर बैठक
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. अनेक बैठका होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई मनपा निवडणूकीसाठी महायुती अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक सुरू असल्याची माहिती मिळत असून मुंबईत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सक्रिय होणार असल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाच्या नेत्यांवरही जबाबदारी देण्यात येणार आहे.
Summary
मुंबई मनपा निवडणूकीत महायुती अॅक्शन मोडमध्ये
उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक
मुंबईत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस होणार सक्रीय
