Eknath Shinde - Ravindra Chavan : रविंद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंमध्ये पार पडली बैठक; आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Eknath Shinde - Ravindra Chavan ) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. जागावाटपाबाबत चर्चा सुरु झाल्या असून बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महायुतीचा महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र लढणार असल्याचे बोलले जात असून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजप वेगवेगळे लढणार असल्याची काल माहिती समोर आली. याच पार्श्वभूमीवर आता रविंद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे.
आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी चर्चा सुरू होणार असून दोन्ही पक्षांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करणार आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे उल्हासनगर मध्येही एकत्र लढणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
रवींद्र चव्हाण- एकनाथ शिंदेंमध्ये देवगिरीवर काल रात्री बैठक पार पडली
आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा
स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी चर्चा सुरू होणार
