Cidco
महाराष्ट्र
Cidco : सिडकोच्या घरांच्या प्रश्नांवर आज बैठक
सिडकोच्या घरांच्या किमती जास्त असल्यामुळे ही घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Cidco) सिडकोच्या घरांच्या किमती जास्त असल्यामुळे ही घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सिडकोच्या घरांच्या प्रश्नांवर बैठक पार पडणार आहे.
विधीमंडळातील कामकाज सल्लागार समिती कक्षात दुपारी ३ वाजता ही बैठक पार पडणार असून सिडकोचे एमडी व नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिवांसह महत्त्वाचे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत.
भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी याविषयी काल आंदोलन केलं असून आता या बैठकीनंतर सिडको घरांच्या किंमती कमी करणार का? हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.
Summery
सिडकोच्या घरांच्या प्रश्नांवर आज बैठक
भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी काल केले होते आंदोलन
सिडको घरांच्या किंमती कमी होणार का? याकडे लक्ष
