मुंबईकरांनो, ‘या’ मार्गावर असेल मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक
मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध आभियांत्रिक आणि देखभाल–दुरुस्तीच्या कामांसाठी आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यामुळे या काळात लोकल विलंबाने धावणार आहेत.
माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लाॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यानच्या धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील आणि नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील, माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
मानखुर्द आणि नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.२८ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मानखुर्द सेक्शनवर विशेष लोकल चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत ट्रान्स-हार्बर / मेन लाईनवरून प्रवास करु शकतात.