Mega Block: मध्य रेल्वेवर आज 4 तासांचा ब्लॉक, प्रवाशांनी जाणून घ्या वेळापत्रक
मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड या अप आणि डाऊन जलद मार्गावर चार तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकल ट्रेन सेवा प्रभावित होणार असून, प्रवाश्यांनी याची नोंद घ्यावी.
मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या, रविवार 8 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत वाजेपर्यंत माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ( सीएटृसएमटी) सुटणाऱ्या आणि त्या दिशेने येणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील जलद लोकल या माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच, या लोकल 15 मिनिटे उशिराने धावतील. तर हार्बर मार्गावरही कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.10 ते 4.40 वाजेपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे या मार्गावर ब्लॉक असेल.