संक्रांतीनंतरही यंदा महाराष्ट्र गारठणार! थंडी वाढणार हवामान विभागाचा अंदाज

संक्रांतीनंतरही यंदा महाराष्ट्र गारठणार! थंडी वाढणार हवामान विभागाचा अंदाज

मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होत जाते असा अनेकदा अनुभव आहे. मात्र, यंदा महाराष्ट्राला हुडहुडी भरण्याची शक्यता आहे.

मुंबई : मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होत जाते असा अनेकदा अनुभव आहे. मात्र, यंदा महाराष्ट्राला हुडहुडी भरण्याची शक्यता आहे. पुढील १० दिवस महाराष्ट्रालाही कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे, असा अंदाज हवामान विभागने वर्तविला केला आहे.

संक्रांतीनंतरही यंदा महाराष्ट्र गारठणार! थंडी वाढणार हवामान विभागाचा अंदाज
रामदास कदमांच्या ‘त्या’ विधानानंतर सुषमा अंधारे आक्रमक; म्हणाल्या, बाईचा पदर...

महाराष्ट्रातील विविध शहरात पुढील काही दिवसांत विक्रमी थंडी जाणवण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथे थंडी वाढणार आहे. नाशिकसह नागपूर, मुंबई, पुणे आदी ठिकाणी पारा १० अंशाच्या खाली येण्याचा अंदाज आहे. मुंबईचा पारा १० अंशांच्या खाली घसरण्याची शक्यता आहे. तर, मालेगाव व पुणे ७, नाशिक ६, औरंगाबाद ५, नागपूर ६, कोल्हापूर ८ सेल्सिअस खाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com