गुंदवली मेट्रो स्टेशन लोकार्पणावेळी पोलिसांकडून नागरिकांवर लाठीचार्ज
महाराष्ट्र झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आज मुंबई नुकताच मुंबईत दाखल झाले. बीकेसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ही सभा आटपून पंतप्रधान मोदी गुंदवली मेट्रो स्टेशन लोकार्पणासाठी गेले. मात्र, त्याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी जमली. गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेल्यामुळे पोलिसांकडून नागरिकांवर त्याठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला.
गुंदवली मेट्रो स्टेशन लोकार्पणाच्या वेळी पंतप्रधान उपस्थित असताना नागरिकांवर ही लाठीचार्ज करण्यात आली. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, त्याठिकाणी पोलिसांकडून ही लाठीचार्ज का करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून कुठलेही माहिती कळलेली नाहीये. परंतु, आता विरोधकांकडून या घटनेमुळे टीका होण्याची शक्यता निर्माण झाली.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. तसेच मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे.