महाराष्ट्र
MAHA TET Exam | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा कालावधी ठरला
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेचा कालावधी आता ठरला आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.