Mhada : म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीला कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस
थोडक्यात
म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
यंदा प्रत्येक कर्मचाऱ्याला 25 हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय
म्हाडा प्राधिकरणाच्या अलीकडील बैठकीत बोनससंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला
(Mhada) दिवाळीपूर्वी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. यंदा प्रत्येक कर्मचाऱ्याला 25 हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
म्हाडा प्राधिकरणाच्या अलीकडील बैठकीत बोनससंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला होता. चर्चेनंतर सर्वसंमतीने 25 हजार रुपयांच्या बोनसला मंजुरी देण्यात आली होती. 2024 मध्ये कर्मचाऱ्यांना 23 हजार रुपये बोनस दिला होता. या वर्षी कर्मचारी संघटनांनी बोनस वाढवण्याची मागणी लावून धरली होती. काही संघटनांनी थेट 30 हजार रुपयांची मागणी केली होती. अखेरीस म्हाडा कर्मचाऱ्यांना 25 हजारांचा बोनस देण्याचे मंजूर करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी महापालिका कर्मचार्यांना 29 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा त्यात 500 ते 1 हजार रुपयांची वाढ होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना बोनसवाढीमुळे म्हाडाच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.