डोंबिवलीत म्हाडाचे लाभार्थी मुदत उलटूनही प्रतीक्षेत

डोंबिवलीत म्हाडाचे लाभार्थी मुदत उलटूनही प्रतीक्षेत

Published by :
Published on

डोंबिवलीजवळ असलेल्या खोनी परिसरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडाचा प्रकल्प सुरू आहे. 2018 साली या घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. लाभार्थ्यांना मार्च 2021 पर्यंत घराचा ताबा देण्याचे आश्वासन म्हाडाकडून देण्यात आलं होतं.

या घरासाठी लाभार्थ्यांनी 90 टक्के रक्कम देखील भरली. मात्र मुदत उलटूनही अद्यापही या इमारतीचे काम सुरू आहे. आज लाभार्थ्यांनी रकमेचा भरणा करून देखील घरे मिळालेली नाहीत. आमचे राहत्या घराचे भाडे भरा, अन्यथा शेवटचा हप्ता माफ करा, अशी मागणी या नागरिकांनी केली. तसेच नाराजी व्यक्त करत म्हाडाच्या कारभाराता विरोध केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com