महाराष्ट्र
नरक यातना भोगत आहोत; संक्रमण शिबिरातील कुटुंबांचा टाहो
मायानगरी मुंबईत संक्रमण शिबिराच्या नावाच्या छल छावण्यात चार ते पाच दशकांपासून राहणाऱ्या नागरिकांची अवस्था आणि व्यथा कोणालाही व्यथित करतील अशा आहेत.
निखील सावंत | मुंबई : एका बाजूला आकाशाला भिडल्या जाणाऱ्या मोठया इमारती आहेत. मात्र, मायानगरी मुंबईत संक्रमण शिबिराच्या नावाच्या छल छावण्यात चार ते पाच दशकांपासून राहणाऱ्या नागरिकांची अवस्था आणि व्यथा कोणालाही व्यथित करतील अशा आहेत.
कधी पुनर्वसनाच्या नावाखाली तर कधी पुनर्विकासाच्या नावाखाली स्थलांतरित केलेली अनेक कुटुंबे नव्या इमारतीत आलेलीच नाहीत. ते राहत असलेल्या इमारतींची अवस्था जनावरांच्या कोंडवड्यापेक्षा भीषण बनल्याचे वास्तव आहे.
आमची बिल्डिंग पडल्यानंतर हक्काचे घर सोडून आम्ही म्हाडा संक्रमण शिबिरात गेले. 50 वर्षे नरक यातना भोगत आहोत. आमची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. आमच्या मुला-बाळांना सुखात राहू द्यात, अशी मागणी खार निर्मलनगर म्हाडा संक्रमण शिबिर 9 आणि 10 मधील मूळ रहिवाश्यांनी केली आहे.